कोकण दुर्गयात्रा – निवती, सिंधुदुर्ग

भल्या पहाटे जाग आली ती एका कोकणी म्हातार्‍याच्या बडबडीने आणि शेजारी उभ्या असलेल्या येष्टी च्या घरघर ने. निवती गावातील माणसे जशी जागी होऊ लागली तसे त्यांचे कुतुहल सुद्धा जागे होऊ लागले… घार जशी आपल्या सावजा भोवती घिरट्या मारते तसे एकेक गावकरी येऊन आमच्या तंबू भोवती घिरट्या मारत होता… कोण, कुठले, कशासाठी आला वगैरे प्रश्न वाढायच्या… Read More

कोकण दुर्गयात्रा – तेरेखोल, रेडी, वेंगुर्ला

सकाळची १०:३० ची वेळ. चार दुर्गयात्री तेरेखोलच्या खाडीवर फेरीची वाट पाहत उभे होते. आधीच एक दिवस उशीर झाला असल्याने फेरीला केरीमच्या धक्क्यावर येताना होणारा उशीर पाहून आमची घालमेल होत होती. काही करून आज तेरेखोल आणि रेडीचा यशवंतगड पाहून मुक्कामी निवती गाठायची होती. तरच आखलेली मोहीम आटोक्यात येणार होती. तुमच्या लक्षात आले असेलच हे दुर्गयात्री कोण होते… Read More

कोकण दुर्गयात्रा

आम्ही ट्रेक कसे ठरवतो हे आत्तापर्यंत तुम्हाला माहित झाले असेलच परंतु हा ट्रेक (खरेतर दुर्गयात्रा) आधीच ठरली होती. मागच्या महिन्यातील जावळी मोहिमेतच पुढचा ट्रेक सी लेवलला करायचा ठरले होते. त्याला फक्त एक आखीव रेखीव स्वरूप देणे बाकी होते. आणि ते काम दोन मिशीवाल्यांनी (एक वारज्याची आणि एक खराडीची) हाती घेतले होते. आंबेगाव बुद्रुकचे “राजकुमार काकडे” सी… Read More

येता जावळी जाता गोवळी!!!

गेले तीन महिने घरात नुसती गडबड चालू होती. घरात लहान बाळ असेल तर वेळ कसा जातो ते कळतसुद्धा नाही. दसरा-दिवाळीची धामधूम संपली होती. आता एखाद्या विकेंडला सह्याद्रीमध्ये जाऊन सणासुदीची सांगता करायची असे ठरवत होतो. शेवटी गेल्या शनिवारी सगळे जुळून आले. नुकतेच अनुप जावळी खोऱ्यात जाऊन “बुश व्ह्याकिंग” करून आला होता. शिवाय आत्ताचा वेळ त्या भागात… Read More

गडकोटांवरील गणेश मूर्ती

सह्याद्रीची भटकंती करत असताना कुठल्याही गड किल्ल्यावर २ देव हमखास आढळून येतात. हनुमान आणि गणपती… आज गणेश चतुर्थीच्या निमित्त काही आडबाजूच्या थोड्याशा दुर्लक्षित पण तरीसुद्धा शेकडो वर्षापासून टिकून असलेल्या गड किल्यावरच्या ११ गणेश मूर्तीं बद्दलची ही माहिती… 

कातळकभिन्न सरसगड

मागच्या शेवाळलेल्या भटकंतीनंतर दोन-तीन आठवडे उलटून गेले असल्याने पुढच्या भटकंतीचे वेध लागले होते. त्यातून रमजान-ईदच्या सुट्टीला जोडून विकेंड आला होता. त्यामुळे या संधीचा फायदा उठवत एखादी मोठी भटकंती आखावी असे डोक्यात होते पण असे ठरवून भटकंती कधी होते का? उपटसुंभासारखी अनेक छोटी मोठी कामे मध्ये मध्ये कडमडत गेली आणि मोठ्या भटकंतीचे स्वप्न हवेतच राहिले. श्रावण… Read More