Posts Tagged भटकंती

बारा मोटेची विहीर – लिंब

साताऱ्यापासून हाकेच्या अंतरावर म्हणजे पुणे-सातारा रस्त्यावर डावीकडे “लिंब” गाव आहे. कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या या गावात अनेक घाट आणि मंदिरे आहेत. यामध्ये विष्णू-लक्ष्मी, मुरलीधर, रामेश्वर ही काही मुख्य मंदिरे. रामेश्वर मंदिराच्या शेजारी अजून एक छोटे मोडकळीस आलेले मंदिर आहे. या मंदिरामध्ये १८ व्या शतकातील भित्तीचित्रे आहेत पण मंदिरातील मूर्ती गायब आहे. लक्ष्मी-विष्णू मंदिर हे तटबंदी… Read More

कोकण दुर्गयात्रा – भरतगड, भगवंतगड, देवगड

सह्याद्रीच्या अंगा-खांद्यावर खेळलेल्या जातिवंत भटक्यांना डोंगर चढ-उतर केल्याशिवाय ट्रेकिंग ची मजाच येत नाही. आमचेसुद्धा तसेच झाले होते. कोकणाच्या दुर्गयात्रेसाठी आलो असलो तरी जवळपासचे डोंगरी किल्लेसुद्धा साद घालत होते. म्हणूनच आमच्या या दुर्गयात्रेमध्ये दोन डोंगरी किल्ले जोडले. भरतगड आणि भगवंतगड. मालवण पासून फक्त १६ किमी अंतरावर असलेली ही दुर्गजोडी पाहणे म्हणजे भटक्यांना एक पर्वणीच ठरते.

कोकण दुर्गयात्रा – निवती, सिंधुदुर्ग

भल्या पहाटे जाग आली ती एका कोकणी म्हातार्‍याच्या बडबडीने आणि शेजारी उभ्या असलेल्या येष्टी च्या घरघर ने. निवती गावातील माणसे जशी जागी होऊ लागली तसे त्यांचे कुतुहल सुद्धा जागे होऊ लागले… घार जशी आपल्या सावजा भोवती घिरट्या मारते तसे एकेक गावकरी येऊन आमच्या तंबू भोवती घिरट्या मारत होता… कोण, कुठले, कशासाठी आला वगैरे प्रश्न वाढायच्या… Read More

कोकण दुर्गयात्रा – तेरेखोल, रेडी, वेंगुर्ला

सकाळची १०:३० ची वेळ. चार दुर्गयात्री तेरेखोलच्या खाडीवर फेरीची वाट पाहत उभे होते. आधीच एक दिवस उशीर झाला असल्याने फेरीला केरीमच्या धक्क्यावर येताना होणारा उशीर पाहून आमची घालमेल होत होती. काही करून आज तेरेखोल आणि रेडीचा यशवंतगड पाहून मुक्कामी निवती गाठायची होती. तरच आखलेली मोहीम आटोक्यात येणार होती. तुमच्या लक्षात आले असेलच हे दुर्गयात्री कोण होते… Read More

कोकण दुर्गयात्रा

आम्ही ट्रेक कसे ठरवतो हे आत्तापर्यंत तुम्हाला माहित झाले असेलच परंतु हा ट्रेक (खरेतर दुर्गयात्रा) आधीच ठरली होती. मागच्या महिन्यातील जावळी मोहिमेतच पुढचा ट्रेक सी लेवलला करायचा ठरले होते. त्याला फक्त एक आखीव रेखीव स्वरूप देणे बाकी होते. आणि ते काम दोन मिशीवाल्यांनी (एक वारज्याची आणि एक खराडीची) हाती घेतले होते. आंबेगाव बुद्रुकचे “राजकुमार काकडे” सी… Read More

येता जावळी जाता गोवळी!!!

गेले तीन महिने घरात नुसती गडबड चालू होती. घरात लहान बाळ असेल तर वेळ कसा जातो ते कळतसुद्धा नाही. दसरा-दिवाळीची धामधूम संपली होती. आता एखाद्या विकेंडला सह्याद्रीमध्ये जाऊन सणासुदीची सांगता करायची असे ठरवत होतो. शेवटी गेल्या शनिवारी सगळे जुळून आले. नुकतेच अनुप जावळी खोऱ्यात जाऊन “बुश व्ह्याकिंग” करून आला होता. शिवाय आत्ताचा वेळ त्या भागात… Read More