Posts Tagged around pune

चला कॅम्पिंगला…

सध्या सोशल नेटवर्कींग साईटसमुळे भटकंतीच प्रचंड आकर्षण निर्माण झालंय. गड किल्ले, जंगल सफारी, ऐतिहासिक ठिकाणे अजून काय काय. यातच एक भर पडत आहे ती कॅम्पिंगची… शहराच्या गोंगाटापासून लांबवर एखादी रात्र मित्रांसमवेत किंवा कुटुंबासमवेत तंबू ठोकून घालवायला कोणाला नाही आवडणार?? एखाद्याा तळ्याच्या काठी तंबू ठोकून, सूर्यास्ताच्या वेळी होणारी रंगांची उधळण पाहण्यातली मजा काही औरच. मग त्यावेळी… Read More

सिक्रेट कॅम्पिंगची गोष्ट

शनिवार-रविवारला जोडून सुट्टी आली कि सगळ्या ट्रेकर्सच्या डोक्यात नानाविध बेत ठरायला लागतात. या वेळी इकडे जाऊ, हे बघितले नाहीये, नवीन जागा हवी, आणि काय न काय. त्यातून आमच्यासारखे ट्रेकर असतील तर बेत नुसते  हवेतच विरणार. मोबाईलवर मेसेज, मेलवर चर्चा, फोनवर बडबड. असे आठवडाभर खेळ झाले तरी इकडे जाऊ का तिकडे असेच चालू असते. शेवटी मग कोणीतरी कंटाळून कल्टी मारतोच. मग पुन्हा नव्या भिडूच्या शोध…. Read More

भुलेश्वर उर्फ किल्ले दौलत मंगळ

पुण्याच्या आसपास भटकंती करण्यास प्रचंड वाव आहे. कधी सह्याद्रीच्या अंगा-खांद्यावर चढायचे तर कधी धरणाच्या जलाशयापाशी पक्षी निरीक्षण करायचे. तर कधीपुरातन मंदिरे बघत फिरायचे. असेच एक पुरातन मंदिर पुण्याच्या अगदी जवळ आहे. भुलेश्वर. पुणे-सोलापूर रोडला लागुनच. पुणेकरांना थोडेसे अपरिचित असे हे ठिकाण.

एका “पॅसेंजर” चा प्रवास…

झुक झुक झुक झुक अगीन-गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया… मामाच्या गावाला जाऊया… लहानपणी आपण सर्वांनीच ही कविता ऐकली आहे, गायली आहे अणि अनुभवलीसुद्धा आहे. रेल्वेची क्रेझ कोणाला नसते? लहानपणात भोंगा वाजवत येणारी, धुरांचे ढग हवेत सोडणारी रेल्वे बघण्याचे वेड असते तर मोठेपणीसुद्धा रेल्वेमध्ये बसायला एक वेगळीच मजा येते. नुकताच माझा रेल्वे प्रवासाचा… Read More

सांधण व्हॅली

“या वीकेंडला ट्रेकला जायचे” असे ठरवले कि नेमके काहीतरी कारण निघते आणि सगळ्यावर पाणी फिरते (निदान माझ्या बाबतीत तरी). नुकताच प्रचीतगड असाचहुकल्यामुळे मी अज्याला काहीच कमिट करत नव्हतो. तरी सुद्धा त्याने नेटाने “जायचेच” असे ठरवले होते. बरेच दिवसांनी (खरेतर वर्षांनी म्हणायला पाहिजे!!) स्वानंद, अजय आणि मी एकत्र ट्रेकला जाणार होतो. पण सगळे व्यवस्थित घडेल तर… Read More