Posts Tagged sahyadri

कैसी ही सुवेळा

रोज घरातून बाहेर पडताना दूरवर दिसणारा सिंहगड माझी धांदल पाहून हसायचा आणि म्हणायचा “आज पण धुरात आणि घरात दिवस जाणार वाटते… ये जरा सह्याद्रीत ये. मोकळी हवा घे. मला भेटायला ये. सह्याद्रीला भेटायला ये…” मी आपले मुकाट्याने पुढे जायचो. मनात फक्त म्हणायचो “बघू या वीकेंडला”. बरेच महिने घरी बसल्यामुळे घरातलेच आता मला वैतागले होते. मी… Read More

मानगड-तळागड-कुडा लेणी

गेले काही महिने ट्रेकिंग आणि भटकंतीपासून लांबच होतो. छोट्या पिल्लू बरोबर खेळून एवढी दमछाक होते की परत वेगळी दमछाक करून घ्यायला गडकिल्ले पाहायला जायचे होते नव्हते. पण अंतरीची ओढ वेगळेच सांगत होती. निदान एक दिवस का होईना आमच्या गुरूला भेटायला तरी जायलाच हवे. शेवटी मना(न्या)चा कौल घेतला आणि बेत ठरला. अशावेळी भिडू जमायला वेळ लगत… Read More

चिंब भटकंतीचा श्रीगणेशा – भोरगिरी

नमस्कार मित्रांनो. गुडघेदुखी मुळे गेले काही महिने घरातच बसून राहावे लागले होते. शेवटचा ट्रेक तर कधी झाला हेच विसरून गेलो होतो मी. त्यातच गेल्या महिन्यात मला कन्यारत्न झाल्याने ट्रेक अजूनच लांबले होते. शेवटी बायको माहेरवासास गेल्याने माझा बोम्बल्या फकीर झाला होता. उन्हाने यंदा तर उत आणला होता. पुण्यात तर पारा ४२ अंशापर्यंत गेला होता. त्यामुळे… Read More

सिक्रेट कॅम्पिंगची गोष्ट

शनिवार-रविवारला जोडून सुट्टी आली कि सगळ्या ट्रेकर्सच्या डोक्यात नानाविध बेत ठरायला लागतात. या वेळी इकडे जाऊ, हे बघितले नाहीये, नवीन जागा हवी, आणि काय न काय. त्यातून आमच्यासारखे ट्रेकर असतील तर बेत नुसते  हवेतच विरणार. मोबाईलवर मेसेज, मेलवर चर्चा, फोनवर बडबड. असे आठवडाभर खेळ झाले तरी इकडे जाऊ का तिकडे असेच चालू असते. शेवटी मग कोणीतरी कंटाळून कल्टी मारतोच. मग पुन्हा नव्या भिडूच्या शोध…. Read More

माणदेशीची दुर्गजोडी : वर्धनगड आणि महिमानगड

काल दिवसभराच्या थकव्यानंतर लागलेल्या गाढ झोपेला चाळवले ते बोकीलच्या रागदारीने. भल्या पहाटे कसला किडा वळवळत होता त्याच्या अंगात कोणास ठाऊक?  आणि बाजूच्या रानातले मोर कर्कश्य आवाजात केकाटून त्याला बाहेरून साथ देत होते. शेवटी मला झोपेचा गाशा गुंडाळून उठावेच लागले तेव्हा कुठे हे दोन्ही आवाज शांत झाले. मोरांचा माग घेण्यासाठी मी बाहेर आलो तर बाहेरचे आल्हाददायक वातावरण पाहून फारच सुखावून गेलो. सूर्याची कोवळी किरणे दारातून आत शिरू… Read More

शिवनिर्मित संतोषगड आणि वारुगड

सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील राजगड, तोरणा सारख्या अभेद्य आणि आकाशाला गवसणी घालणाऱ्या गडकिल्ल्यांपुढे माणदेशातील छोटेखानी लुटूपुटूचे किल्ले दुर्लक्षित झाले आहेत. सह्याद्रीत तुफानी पाऊस पडत असला तरी हे किल्ले अजूनही पावसाच्या पहिल्या सरीसाठी आतुरले आहेत. या किल्ल्यांच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी आणि आमची भटकंतीची हौस भागवण्यासाठी आम्ही निघालो होतो. बोकीलने या वेळी सामान्य माणसाप्रमाणे ४ दिवसाचा बेत आखला. फक्त यात त्याने १०… Read More