Posts Tagged Wai

वाईजवळची पालपेश्वर लेणी

वाई. पश्चिम महाराष्ट्रातील एक इतिहासप्रसिद्ध गाव. कृष्णातीरावरचे एक टुमदार शहर. खूप पूर्वीपासून या गावाला महत्व आहे. आणि माझे बालपण येथे गेल्याने माझ्या दृष्टीने फारच. वाईला जसा कलेचा, इतिहासाचा ठेवा लाभला आहे तसाच निसर्गसौंदर्याचा ठेवा सुद्धा भरपूर आहे. परिसरात अनेक किल्ले, धरणे, आणि लेणी आहेत. त्यातीलच एक पालपेश्वर.

वाईचे महागणपती मंदिर

महाराष्ट्राला जसा सह्याद्रीचा नैसर्गिक ठेवा आणि छत्रपतींचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे तसाच कला, संस्कृतीचा सुद्धा वारसा लाभला आहे. इथली अनेक प्राचीन आणि मध्ययुगीन गावे कलेच्या आणि संस्कृतीच्या आविष्काराने नटली आहेत.